कधी कधी वाटतं की आपल्या आवडत्या माणसाचा आपल्याला फोन यावा...
आपण तासान न तास त्याच्याशी गप्पा माराव्यात....
पण असं होत नाही.. त्याचा फोन येतच नाही..
येतो तो फक्त मेसेज...
तो कुठे बाहेर चालला असेल तर.. घरी पोचला असेल तर.. कामात खूप व्यस्त असेल तर... कायमच मेसेजच येतो.....
आपल्याला खूप, अगदी खूप वाटतं की त्याने फोन करावा...
'तू कशी आहेस... तुझी खूप आठवण येतीये... असं म्हणावं... '
पण हळू - हळू कळत जातं की माणसांना मुळातच असे फोन - बिन करायची सवय नसते..
बिन कामाच्या गप्पा मारायची पण सवय नसते...
त्यांना कायम रस असतो तो त्यांच्या कामात... मग या सगळ्या गडबडीत जी आपल्याला खूप आवडते तिच्याकडे दुर्लक्ष झालं तरी चालतं.. कारण ती समजून घेते ना.. की आपलं काम किती महत्वाचं आहे ते....
आणि मग एकाद्या हळव्या क्षणी बांध फुटतो आपला न स्वतालाच प्रश्न पडतो की -
आपल्या आवडत्या माणसाचा आपल्याला फोन यावा...
पण असं काही म्हणजे काहीच होत नाही.. न आपल्याला असं उगाच वाटत राहता.... की आपल्या आवडत्या माणसाचा आपल्याला फोन यावा...
2 comments:
कधी कधी वाटतं..."
wow it is to touching
Gr8
very very touchy....
vrushali khup chhan mandalyat tu tya bhavna pan mala tar tyacha message pan yet nahi to evada busy asel ka...
ka to mala gruhit dhartoy.....
Post a Comment