मला असं वाटलं होतं की मला प्रत्येक नातं सांभाळता येतं... मी नात्यांमधला तोल सांभाळू शकते.. पण नाही...त्याने माझे डोळे उघडले... त्याला पाहिजे तेंव्हा मी त्याच्या सोबत होते... अन आता त्याला नको आहे तेंव्हा मी सोबत नाही... "प्रत्येक वेळेस काळजाला भिडणारे नाते जुळेल" असं सांगता येत नाही... कदाचित मी त्याच्यात काहीतरी चुकीचं शोधत असेल.... 'मित्र.. तो पण जवळचा झाला"च" पाहिजे' असा माझा वेडगळ हट्ट असतो... कारण मला वाटतं की मला मानसं खुप चांगली कळतात.. माझ्या या समजुतीला चांगलाच सुरुंग लागला जेंव्हा सगळं काही असून बिनसायला लागलं... अन हे बिनसणं फक्त माझ्या बाजूने होतं.. त्याला त्याचा काही गंधही नव्हता. .. कदाचित माझ्यापेक्षा चांगल्या मुली त्याच्या आयुष्यात असतील.. किंवा माझ्या सोबत वेळ घालवणं त्याला निरर्थक वाटत असेल... किंवा त्याला मैत्री वाढवायची नसेल.. एक फक्त नातं की जे कधीही गळून पडेल असा हवं असेल...
किती तरी शक्यता असतील... त्यातून आपल्याला जी शक्यता सोयीची वाटेल ती आपण घेऊन आपल्या मनाचे समाधान करून घेत असतो.. खरं - खोटं हे बघायला जात नाही.. कदाचित जो आरसा आपल्याला दिसेल त्याने आपण कदाचित सामोरे जाण्यास तयार नसू...
No comments:
Post a Comment